मराठा आरक्षणाविरुद्धच्या याचिकेवर ॲड. हरिष साळवे मांडणार शासनाची बाजू
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवी हे तयार झाले आहेत. आज दुपारी मुंबईतील एका हॉटेलमध्ये यासंदर्भात ॲड. साळवी यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव डी.के. जैन, महाधिवक्ता यांनी चर्चा केली.
विधीमंडळात मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर उच्च न्यायालयात याविरुद्ध दाखल झालेल्या रिट याचिकासंबंधी या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी आरक्षणासंदर्भात न्यायालयात बाजू मांडण्यासंदर्भातील विविध बाजूंवर मते व्यक्त झाली. या याचिकेवर राज्य सरकारची बाजू मांडण्याची राज्य शासनाची विनंती ॲड. साळवी यांनी स्विकारली आहे. त्यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.