डिएड-बीएड धारकांना खुषखबर : जानेवारीत शिक्षक भरती होणार

डिएड-बीएड धारकांना खुषखबर : जानेवारीत शिक्षक भरती होणार

मुंबई : राज्य सरकारने मेगाभरतीचा निर्णय घेतल्यानंतर आता शिक्षक भरतीच्या हालचालींना वेग आला आहे. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजेच येत्या जानेवारीत शिक्षक भरती होणार असल्याने राज्यातील लाखो डिएड-बीएड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यातील लाखो डिएड-बीएड धारकांना खुषखबर मिळणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात शिक्षक भरती करण्याचा सरकारचा मानस आहे. राज्यात गेल्या १० वर्षापासून शिक्षक भरती प्रलंबित असून, सुमारे १ लाख ७८ हजार डिएड-बीएड धारक उमेदवार भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. राज्यात एकूण
३५ हजाराहून अधिक जागा शिक्षकाच्या जागा रिक्त असल्याचे समजते. येत्या जानेवारीत होणा-या शिक्षक भरतीत ७० टक्के शिक्षक भरती ही स्थानिक स्वराज्य संस्थेत होणार आहे.या निर्णयाचा सर्वाधिक लाभ हा
ग्रामीण भागातील उमेदवारांना होणार आहे.

शिक्षक भरती संदर्भात आज राज्यातल्या शिक्षण अधिका-यांची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. शिक्षण आयुक्तांसह संचालकांनी व्हिडिओ काॅन्फरंसच्या माध्यमातून शिक्षक भरतीचा आढावा घेतला.या बैठकीत शिक्षक भरती प्रक्रिया आणि मराठा आरक्षण अंमलबजावणीवर चर्चा करण्यात येवून,खासगी शिक्षण संस्थांना सर्व आरक्षणांसहीत किती जागा रिक्त आहेत याची माहिती देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

Previous articleशिवसेनेसोबत युती होणारच : मुख्यमंत्री
Next articleकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू होणे लांच्छनास्पद: विखे पाटील