राणेंनी शिवसेनेची चिंता करु नये : उदय सामंत

राणेंनी शिवसेनेची चिंता करु नये : उदय सामंत

नाशिक : कोकणातून शिवसेना संपणार. “शिवसेना हटाव, कोकण बचाव’ या आमदार नितेश राणे यांच्या ट्विटर वरील विधानावर म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी अत्यंत तिखट शब्दात राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ” राणे यांनी शिवसेनेची चिंता सोडावी. शिवसेना आणि कोकण हे एक समीकरण आहे. कोकणातून कोणाला संपवायचे हे कोकणवासी ठरवतील.’ अशी प्रतिक्रीया सामंत यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक विभागीय गृहनिर्माण मंडळाची आढावा बैठक म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी त्यांनी नव्या वर्षात बाराशे घरांची लॉटरी आचारसंहिता लागू होण्यापुर्वी काढण्यात येईल. म्हाडाचे स्नेहसंमेलन नाशिकला होईल असे त्यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेविषयी केलेल्या वक्तव्याविषयी त्यांना विचारणा झाली. यावेळी ते म्हणाले, शिवसेना संपवणार, शिवसेना संपली अशी विधाने करणारे संपले. शिवसेना कोकणात पाय घट्ट रोऊन उभीच आहे. कारण शिवसेना आणि कोकणवासीय हे एक भावनिक समीकरण आहे. कोकणवासीयांच्या हक्काच्या संघर्षात सतत शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहिली. मी स्वतः बेचाळीस हजार मतांनी निवडुन आलो आहे. माझ्या जिल्ह्यात छपन्न जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. रत्नागिरी नगरपालिकेत तीस पैकी बावीस नगरसेवक शिवसेनेचे आहेत. दोन्ही पंचायत समित्यांत शिवसेनेची सत्ता आहे. कोणी म्हटल्याने शिवसेना संपत नाही. त्यामुळे “कोकण म्हणजे शिवसेना’ आणि “शिवसेना म्हणजे कोकण’ हे एक समीकरण आहे.

Previous articleराम मंदिराचा निर्णय घेणे न्यायालयाचे काम नाही : संजय राऊत
Next articleडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांना सरकारच्या इच्छेनुसार जामीनः सावंत