प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमची साथ सोडली तरच महाआघाडीत स्थान

प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमची साथ सोडली तरच महाआघाडीत स्थान

मुंबई: निवडणूक जाहीर झाली नसली तरीही राजकीय घडामोडींना जबरदस्त वेग आला आहे. सर्वच पक्षांनी डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीची महाआघाडी प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघास आघाडीत घेण्यास उत्सुक आहे. मात्र एमआयएमची साथ सोडण्याची अट आंबेडकरांना घातली आहे. भारिप बहुजन महासंघाने एमआयएमशी युती केली आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आंबेडकरांशी झालेल्या चर्चेत हाच निरोप दिला आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ओवेसीच्या एमआयएमने एकत्रितपणे निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे.

महाआघाडीत प्रकाश आंबेडकरांना घेण्यास दोन्ही कॉंग्रेस उत्सुक आहेत.पण एमआयएमची साथ आंबेडकरांना सोडावी लागेल. कॉंग्रेसच्या धोरणानुसार एमआयएमशी जुळवून घेता येणार नाही. कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्ये सध्या जागावाटपावर बैठकांचा सिलसिला सुरू आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीत आठ जागांबाबत वाद आहेत.पण त्यावर चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही त्वरित उत्तर द्यावे, असा दोन्ही पक्षांचा आग्रह आहे. आंबेडकरांना महाआघाडीत घेण्यासाठी राजू शेट्टी यांनीही प्रयत्न करून पाहिला होता. परंतु आंबेडकरांनी अजून आपला निर्णय कळवलेला नाही.

Previous articleसरळसेवा भरतीत पुन्हा समांतर आरक्षण लागू
Next articleस्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूखंड भाडेकराराचे नोंदणी व मुद्रांक शुल्क माफ