मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीवर ७ लाखांचा खर्च

मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीवर ७ लाखांचा खर्च

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत मुंबई विद्यापीठाने ७.४४ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई विद्यापीठाने दिली आहे. यात सर्वाधिक ५.६५ लाख रुपयांचा खर्च हा प्रवास आणि जाहिरातींवर करण्यात आला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे दिनांक २७ मार्च २०१८ रोजी माहिती मागितली होती की मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत सर्वप्रकारच्या झालेल्या निवडणूक खर्चाची माहिती देण्यात यावी. अनिल गलगली यांच्या अर्जाला तब्बल ९ महिन्यानंतर मुंबई विद्यापीठाने उत्तर देत माहिती दिली.

मुंबई विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाचे उप कुलसचिव राजेंद्र आंबवडे यांनी अनिल गलगली यांस कळविले की मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत ७ लाख ४४ हजार ४९९ रुपये खर्च झाले आहेत. या खर्चात सर्वाधिक खर्च हा प्रवास यावर झाला असून त्याची एकूण रक्कम ३ लाख २२ हजार ८९ रुपये आहे तर त्यानंतर जाहिरातीवर २ लाख ४३ हजार २३२ रुपये खर्च झाले आहे. सॉफ्टवेअरसाठी ६८ हजार ८१० रुपये, टोनर रीफिल्लिंगसाठी १६ हजार ६३८ रुपये, डेकोरेशनसाठी २० हजार ५०० रुपये, ट्रेनिंग वोट काऊटिंगसाठी ३ हजार ३३० रुपये तसेच ६९ हजार ९०० रुपये हे हॉस्पिटलिटीवर खर्च करण्यात आले आहे.

Previous articleसरकारमुळे शेतकऱ्यांवर अॅंजिओप्लास्टीची वेळ : विखे पाटील
Next articleनववर्ष साजरे करण्यासाठी बाजारपेठा चोवीस तास खुल्या ठेवा : आदित्य ठाकरे