२५ जानेवारीला फक्त ‘ठाकरे’च ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही:संजय राऊत

२५ जानेवारीला फक्त ‘ठाकरे’च ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही:संजय राऊत

मुंबई:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ठाकरे’ चित्रपटावरून राजकारण पेटू लागले आहे. दाक्षिणात्यांबद्दल एका संवादाला अभिनेता सिद्धार्थने आक्षेप घेतला असताना चित्रपट सेनेच्या एका नेत्याने २५ जानेवारीला फक्त ठाकरे चित्रपटाशिवाय अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असे म्हटले होते. मात्र ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे शिवसेना नेते आणि चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

२५ जानेवारीला ठाकरे शिवाय इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी दिला. त्याबद्दल संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी शिवसेनेची ही अधिकृत भूमिका नाही, असे सांगितले. ठाकरे हा विषय अनेकांसाठी भावनिक मुद्दा आहे. ते शिवसैनिकाचे वैयक्तिक मत आहे. सेनेची तशी काही भूमिका नाही, असेही ते म्हणाले. ठाकरे चित्रपटात बाबरी मशिदीसंदर्भात आणि दाक्षिणात्यांबद्दल अशा दोन संवादांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे.दोन्ही संवाद राजकीय संवेदनशील मुद्यांवर असल्याने शिवसेनेला इतर पक्ष घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Previous articleकॉंग्रेसने उमेदवारी दिली नाही तरी लोकसभा लढवणारच : सुजय विखे पाटील
Next articleखुशखबर ! १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार