खुशखबर ! १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार
मुंबई :राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना राज्य सरकारने नववर्षाची मोठी भेट दिली आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आजच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्य सरकारच्या सेवेतील निवृत्तीवेतनधारकांसह एकूण २५ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.१ जानेवारी २०१६पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने हा वेतन आयोग लागू होणार आहे. येत्या १ जानेवारी २०१९पासून ही वेतनवाढ मिळणार आहे. तर फेब्रुवारी २०१९च्या पगारामध्ये ही वाढ दिसून येईल.
आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता. प्रत्यक्ष लाभ १ जानेवारी २०१९ पासून देण्यासह तीन वर्षांची थकबाकी २०१९-२० पासून ५ वर्षात ५ समान हप्त्यांत रोखीने देण्याचा निर्णय.
मुंबई मेट्रो मार्ग ४ अ कासारवडवली ते गायमुख या मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मंजुरी.
शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पामध्ये समाविष्ट असणाऱ्या नांदेड शहरानजीकच्या किवळा साठवण तलावाचे काम जलसंपदा विभागामार्फत करण्यास मान्यता.