धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंडेंची ‘अडगळीत’ बदली

धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंडेंची ‘अडगळीत’ बदली

मुंबई : आपल्या धडाकेबाज कामाच्या पध्दतीमुळे सतत बदल्यांचा ससेमिरा पाठीमागे लागलेले बेधडक सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची महाराष्ट्रा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदी तुकाराम मुंढेची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंढे यांची बदली मुख्य प्रवाहातून अन्यत्र केल्याने त्यांना एकप्रकारे अडगळीत टाकण्यात आल्याची चर्चा आहे.

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची आज पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून, तुकाराम मुंढे महाराष्ट्रा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरुन मंत्रालयात बदली येवूनही ते मंत्रालयात रुजू झाले नव्हते. पुणे परिवहन आयुक्तपादावरुन त्यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपशी खटके उडाल्याने त्यांची तडकाफडकी मंत्रालयात बदली करण्यात आली होती.

राज्य सरकारने आज तुकाराम मुंढेंसह अजून तीन सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. शिर्डीतील साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
रूबल अग्रवाल यांची नियुक्ती पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर शितल तेल्ही-उगले यांची नागपूय येथे एन.आर एम.डी.एच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बालाजी मंजुळे यांची अपंग आयुक्त पुणे येथे नेमणूक करण्यात आली आहे.

Previous articleपाच नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी २७ जानेवारीला मतदान
Next articleजाणून घ्या… सातव्या वेतन आयोगामुळे कर्मचा-यांना काय काय मिळणार!