अहमदनगरमध्ये भाजप राष्ट्रवादीची युती ; शिवसेनेला धोबीपछाड! 

अहमदनगरमध्ये भाजप राष्ट्रवादीची युती ; शिवसेनेला धोबीपछाड! 

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक २४ जागा जिंकूनही भाजपने राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याने शिवसेनेला महापौरपदाच्या निवडणुकीत धोबीपछाड मिळाली आहे. आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस, बसप आणि अपक्षाच्या मदतीने महापौर निवडणुकीत विजय मिळवला आहे. भाजपाचे बाबासाहेब वाकळे यांची नगरच्या महापौरपदी निवड झाली आहे. त्यांनी ३७ विरुद्ध शून्य मतांनी विजय मिळवला.

अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक २४ उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला १८, भाजपा १४, बसप ४ आणि अपक्षांना एक जागा मिळाली आहे. आज झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, बसप आणि अपक्षाच्या मदतीने बाजी मारली आहे.शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेने मतदानावर बहिष्कार घातला. महापौरपदाच्या निवडणूकीत शिवसेनेने बाळासाहेब बोराटे यांना रिंगणात उतरवले होते. या ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजपा अशी थेट लढाई होणार होती. मात्र राष्ट्रवादीने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचे स्वप्न भंग झाले.

आजच्या निवडणुकीत वादग्रस्त नगरसेवक छिंदम यांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान केल्याने संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी छिंदम यांना मारहाण केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले.

Previous articleशिवाजी महाराजांच्या साक्षीने  राष्ट्रवादीची ‘परिवर्तन यात्रा’
Next articleराष्ट्रवादीच्या आमदारासह नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस