चंद्रशेखर आझाद यांची नजरकैद ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी :जितेंद्र आव्हाड
मुंबई:भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मालाडमधील एका हॉटेलमध्ये स्थानबद्ध केले आहे. आझाद यांच्या सभांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.या प्रकरणी आता राजकारण पेटू लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज आझाद यांची त्यांच्या खोलीत जाऊन भेट घेतली.नंतर पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी आझाद यांना डांबून ठेवणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचा आरोप केला.
आव्हाड म्हणाले की,अघोषित मार्गाने आणिबाणी आणण्याचा सरकारचा हा डाव आहे. त्याला चैत्यभूमीवर जाण्यापासून रोखले. त्या गेटवरच त्याला अटक केली.सरकैर अशा प्रकारे विरोधकांचा आवाज दाबून टैकू शकत नाही. ही लोकशाहीची हत्या आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली.आजच आझाद यांची सभा वरळीला होणार होती. पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली. तरीही सभा घेणारच, असा निर्धार आझादने केला होता. त्यामुळे पोलिसांनी आझाद यांना मालाडच्या हॉटेल मनालीमध्येच स्थानबद्ध केले. आता या प्रकरणी वेगवेगळे आरोप होत आहेत.१ जानेवारीला भीमा कोरेगावला पुन्हा विजयसभा होणार असून आझाद यांच्या सभेने वातावरण प्रक्षोभक होऊ शकते. खबरदारीचा उपाय म्हणून आझाद यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.