सरकारचा ‘तो’निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण : पवार

पुणे: राज्य सरकारने आणखी ७६ मंडलांमधील १५०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अजित पवार यांनी म्हटले आहे की,राज्यातील ७६ महसुली मंडळांमधील १५०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे.पण नागरिकांना दिलासा देणारा निर्णय आहे.असे जनहिताचे निर्णय अमलात आणण्याची सुबुद्धी सरकारला लाभो, असा टोलाही लगावला.

कमी पावसामुळे राज्यावर संकट ओढवले असताना सरकारने १५१ गावे आणि २०० महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. मात्र यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती.परंतु आज सरकारने आणखी ७६ महसुली मंडळांमधील १५०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळ जाहीर झाल्यावर काही भागांवर अन्याय झाल्याप्रकरणी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत नवीन गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

Previous articleथर्टी फस्टला मुंबईतील पब्ज,बार आणि हॉटेल्स रात्रभर खुले राहणार
Next articleमुख्यमंत्र्यांना साखर कारखानदारीतील काही कळत नसावे : राजू शेट्टी