थर्टी फर्स्टला ‘भाजप सरकार समारोप’ संध्याचे आयोजन !
मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देतानाच भारतीय जनतेने भाजप सरकारलाही निरोप द्यावा म्हणून मुंबईत ” अलविदा भाजप ” अर्थात ” भाजप सरकार समारोप संध्या ” या गीत-संगीत, नाट्य-शाहिरी मैफिलीचे आयोजन गोरेगाव येथील केशव गोरे ट्रस्ट सभागृहात आज ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. ‘ भाजप विरुद्ध भारतीय ‘ ही मोहीम राबविणाऱ्या ” लोकांचे दोस्त ” या संघटनेने ही मैफिल आयोजित केली असून ‘ विद्रोही सांस्कृतिक चळवळ’ ही यात सहभागी आहे.
लोकांचे दोस्त” चे केंद्रीय अध्यक्ष रवि भिलाणे यांनी भारतीय जनतेला आवाहन केले आहे की, आज थर्टी फर्स्ट ला जुन्या वर्षाला निरोप देतानाच भाजपलाही निरोप द्या. थर्टी फर्स्टला होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात ” अलविदा भाजप ” चा सूर उमटू द्या. चित्रपट अभिनेते संदेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अश्विन कांबळे, प्रवीण मसुरकर, संध्या पानसकर, शिवराम सुखी,अविनाश कदम, छाया कोरगावकर, शिल्पा सावंत आदि कलावंत ‘ भाजप सरकार समारोप संध्या’ सादर करणार आहेत.हा कार्यक्रम विनामूल्य असुन सर्व भारतीयांसाठी खुला आहे.