शरद पवार हे काँग्रेसचे वकील : मुख्यमंत्री
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेसचे वकील असून त्यांच्याकडे याशिवाय कोणताच पर्याय नसल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळ्यावरून भाजपने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींवर आरोप केले आहेत. त्यावर शरद पवार यांनी सोनिया गांधींनी पाठराखण करीत हा सोनिया गांधींना बदनाम करण्याचा हा कट असल्याचे विधान केले होते.त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवारांवर आज निशाणा साधला.
ऑगस्ट वेस्टलँड घोटाळ्यावरून भाजपकडून काँग्रेसवर आरोप केले जात असून, भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदा घेवून कॅाग्रेसवर निशाणा साधला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद घेऊन कॅाग्रेसवर निशाणा साधला. या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची बाजू घेत भाजपवर निशाणा साधला असता आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पवार यांना लक्ष्य केले. काँग्रेस पक्षाला शरद पवार यांच्यासारखा वकील लाभला आहे. पण पवारांनाही हे योग्यच असल्याचे मनातून माहीत आहे. त्यांच्याकडेही वकिलीशिवाय पर्याय राहिला नाही. या घोटाळ्याशी सोनिया गांधींचा संबंध नसल्याचे म्हणणेच चुकीचे आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर असे बोलणा-यांना नेता बनण्याचा अधिकार नाही अशा शब्दात त्यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले.