सरकारने फक्त एल्गार परिषदेलाच लक्ष्य केले : प्रकाश आंबेडकर
पुणे: मराठा आणि ओबीसी समाजात दंगली न होता समन्वय रहावा, यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांनाच सरकारने नोटीसा पाठवल्या. मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना मात्र नोटीस देण्यात आली नाही. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे.मराठा आणि ओबीसी समाज यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ती मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एल्गार परिषदेला लक्ष्य केले गेले, असा आरोप आज भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भीमा कोरेगाव येथे लोक एकत्र आहेत.सरकारकडून आलेले वक्तव्य चुकीचे आहे.गेल्या वेळेस जे घडले ते आता घडणार नाही.ग्रामस्थांचा मान सरकारने राखायला हवा होता तो राखला नाही, असा आरोपही आंबेडकर यांनी केला. गेल्या वेळेस जे घडले ते बाहेरच्या लोकांनी येऊन घडवले. मात्र त्यांना नोटीसा दिल्या नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
भीमा कोरेगावला सभा घेण्याची आंबेडकरांची प्रथा नसल्यामुळे त्यांनी सकाळी विजयस्तंभाला अभिवादन करून तडक पुणे गाठले. नंतर पत्रकारांशी संवाद साधला. सकाळी सात वाजताच भीमा कोरेगावला जाऊन त्यांनी विजयस्तंभाचे दर्शन घेतले. तेथे आज लाखो अनुयायी जमले आहेत.