राष्ट्रवादीच्या दगाबाजीमुळे नगरमध्ये भाजपचा महापौर

राष्ट्रवादीच्या दगाबाजीमुळे नगरमध्ये भाजपचा महापौर

मुंबई: अहमदनगरमध्ये भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर जाऊन महापौरपद पटकावल्याने शिवसेना बिथरली आहे. मात्र शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज केलेल्या गौप्यस्फोटामुळे राष्ट्रवादीने केलेल्या दगाबाजीमुळे भाजपचा गेम करण्याचा शिवसेनेचा यशस्वी होऊ शकला नाही, असे उघड झाले.

नगरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असूनही भाजपने राष्ट्रवादीच्या मदतीने महापालिकेतील सत्ता मिळवली. याबाबत रामदास कदम म्हणाले की, शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर पाठिंब्याबाबत चर्चाही केली होती. मात्र राष्ट्रवादीने दगाबाजी केल्याचा आरोप कदम यांनी केला. राष्ट्रवादीचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. भाजपबाबत राष्ट्रवादीची भूमिका दुटप्पी आहे, असेही कदम म्हणाले.

रामदास कदम यांनी सांगितले की, शिवसेना जर सत्तेतून बाजूला झाली तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आमची जागा घेण्यास तयारच आहे, हेच नगरच्या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. म्हणूनच आम्ही सत्तेतून बाहेर पडत नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांशी आमची चर्चा झाली होती. पण राष्ट्रवादीने ऐनवेळी दगलबाजी केली, असे कदम म्हणाले.

काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शिवसेनेला आम्ही बिनशर्त पाठिंबा देणार होतो. पण त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. मात्र कदम यांनी जे सांगितले त्यावरून शिवसेनेला भाजपचा गेम करायचा होता पण तो त्यांच्या अंगावर उलटल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर पॅटर्न राज्यात सगळीकडे वापरला जातो का, या कल्पनेने शिवसेना धास्तावली आहे.

Previous articleव्हिडिओ गेम छोडो, मैदान से नाता जोडो : विनोद तावडे
Next articleसंयुक्त जनता दलाचा तिढा सोडवण्यासाठी कॉंग्रेस धावली पवारांकडे