धनंजय मुंडे यांना जोरदार दणका

धनंजय मुंडे यांना जोरदार दणका

बीड: विधान परिषदेतील विरोधी नेते धनंजय मुंडे यांना जोरदार दणका बसला असून अंबेजोगाई तालुक्यातील जगमित्र साखर कारखाना प्रकरणात पोलिसांनी मुंडे यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.शेतकऱ्यांचे पैसे मुंडे यांनी बुडवल्याचे हे प्रकरण आहे.यामुळे मुंडे  ऐन निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत सापडले आहेत.

तळणी येथील शेतकरी मुंजा गीते।यांची शेतजमिन मुंडे यांनी कारखान्यासाठी  विकत घेतली होती. परंतु यांनी जमिनीच्या बदल्यात गीते यांना दिलेला ४० लाख रूपयांचा धनादेश वटलाच नाही. मुंडे यांनी दिलेला धनादेश न वटल्याने गीते यांनी मुंडे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. मात्र काही कारवाई होत नव्हती. त्यामुळे गीते यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान पोलिसांनी अंबेजोगाई न्यायालयात मुंडे यांच्यावरील दोषारोपपत्र सादर केले.

या अगोदर गीते यांना जमिनीचा मोबदला संपूर्ण देण्यात आला आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले होते.भाजप मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते सांगत होते. पण आता मात्र थेट दोषारोपपत्र सादर झाल्याने मुंडे यांचा बचाव थिटा पडल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये हे प्रकरण चांगलेच पेटणार आहे. शिवसेना आणि कॉंग्रेस मुंडे यांना या प्रकरणी घेरण्याचा प्रयत्न करतील, असा राजकीय वर्तुळात अंदाज आहे. मुंडे यांना मात्र आक्रमक भाजप आणि भाजप राष्ट्रवादी युतीमुळे बिथरलेल्या शिवसेनेच्या संतापाचा सामना करावा लागणार आहे.

Previous articleमोदींसाठी श्रीराम कायद्यापेक्षा मोठे नाहीत
Next articleराज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार?