मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : शरद पवार
मुंबई : रायगड येथिल सकल मराठा समाज वतीने करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान कामोठे कळंबोली येथील निरपराध सुविद्य व्यक्तींवर कलम 307 व इतर गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आल्याप्रकरणी योग्य चौकशी करावी , तसेच निरपराध व्यक्तिंवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी राष्ट्रावादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.
पनवेल कामोठे दौ-यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निवेदन देण्यात आले त्यानुसार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. त्या पत्रात पवार यांनी नमुद केले आहे की, मराठा क्रांती आंदोलनावेळी कामोठे कळंबोली येथील आंदोनात सहभागी असणा-या डॅांक्टर्स, वकिल,नोकरदार महिला सहभागी झाल्या होत्या अशा शांततापुर्ण आंदोलनात सुजाण नागरिकांकडून गंबीर स्वरूपाचे गुन्हे घडतील ही बाब पटण्यासारखी नाही. सदर निवेदन पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. गुन्हे दाखल केलेल्या व्यक्तीच्या यादीचे अवलोकन करण्यात यावे अशी मागणी पवार यांनी करून, कोणत्याही परिस्थितीत निरपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल होवून त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण होणार नाही, पोलीस कोर्ट कचे-यांना निष्कारण सामोरे जावे लागणार नाही याकडे देखील लक्ष द्यावे गटनेतील स्रव व्यक्तींची उचित चौकशी होऊन निरपराध व्यक्तींवरील गुन्हे मागे घेतले जातील अशी राज्याचे प्रमुख म्हणून आपमाकडून अपेक्षा व्यक्त करतो अशी अपेक्षा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्रात व्यक्त केली आहे.