भाजपच्या विजयाबाबत भागवतच साशंक

भाजपच्या विजयाबाबत भागवतच साशंक

मंदिरासाठी दबाव वाढवला

नागपूर: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनीच शंका व्यक्त केली आहे. तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

नागपुरातील एका  कार्यक्रमात भागवत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराबाबत कायद्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अध्यादेश आणणार नाही, असे स्पष्ट केले आहे. याबद्दल भागवत म्हणाले की,पंतप्रधान काहीही म्हणोत. रामाप्रती आम्हाला आस्था असल्याने मंदिर त्याच जागी व्हायला हवे, ही माझी भूमिका स्पष्ट आहे. सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मोदी यांचे विधान मंदिराबाबत सकारात्मक आहे, असे म्हटले होते.मंदिर उभारणीसाठी कायदा बनवावा, असेही ते म्हणाले होते.जोशी यांच्या वक्तव्यांचे आपण समर्थन करतो, असे भागवत म्हणाले.

शैक्षणिक धोरणासंदर्भात भागवत म्हणाले की, त्याची अमलबजावणी आताच झाली पाहिजे. भविष्यात भाजप सत्तेत राहील की नाही, ते सांगता येत नाही.संघाने भाजपवर राम मंदिरासाठी दबाव वाढवायला सुरूवात केली असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भाजपपुढे संघानेच आव्हान उभे केले आहे.शिवसेनेने अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी आक्रमक भूमिका घेत पहले मंदिर फिर सरकार अशी भूमिका घेतली आहे. संघानेही शिवसेनेशी मिळतीजुळती भूमिका घेतल्याने भाजप कात्रीत सापडला आहे.

Previous articleराज्यातील ५० मंडळातील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर
Next articleराज ठाकरे यांचा पुन्हा व्यंगचित्राद्वारे मोदींवर निशाणा