नगरमधिल राष्ट्रवादीच्या त्या नगरसेवकांच्या निलंबनाची शक्यता

नगरमधिल राष्ट्रवादीच्या त्या  नगरसेवकांच्या निलंबनाची शक्यता

उद्या होणार निर्णय

अहमदनगर:संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय झालेल्या नगरच्या महापौर निवडणूक प्रकरणी उद्या मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपला मदत करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १८ नगरसेवकांवर उद्या निलंबनाची कारवाई होईल, असे बोलले जात आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना सर्व नगरसेवक मिळून निवेदन देतील, अशी शक्यता आहे.

भाजपला पाठिंबा देणाऱ्या बसपाच्या चार नगरसेवकांना पक्षाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी तसा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच बसपाने उमेदवार उभे केले होते आणि ते निवडूनही आले. पण त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे.

नगर महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत भाजपबरोबर राष्ट्रवादीचे १८ आणि बसपाचे ४ नगरसेवक गेले. यामुळे  खळबळ उडाली. दस्तुरखुद्द राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाची दखल घेत नगरसेवकांना नोटीस पाठवली. तिला उद्यापर्यंत उत्तर पाठवायचे आहे. मात्र भाजप आणि राष्ट्रवादी यांची नगरमधील युती कदाचित राज्यात होईल, असा चुकीचा संदेश जाईल आणि राष्ट्रवादीला राज्यात याचा फटका बसू शकतो. हे टाळण्यासाठी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना कारवाई करावीच लागेल, अशीही परिस्थिती सध्या आहे.बसपाच्या नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असे समजते. मात्र बसपा नगरसेवक मुदस्सर शेख यांनी आम्हाला अद्याप पक्षाकडून नोटीस मिळालेली नाही. मिळाली तर आम्ही उत्तर देऊ, असे सांगितले.राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे निलंबन होऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत भाजपबरोबर जायचे नाही, असे आम्ही स्पष्ट निर्देश नगरसेवकांना दिले होते, असे शरद पवार यांनी सांगितले होते.

Previous articleयुतीसाठी शिवसेनेसमोर मुळीच झुकणार नाही
Next articleएसटीची आता मालवाहतूक आणि गोदामेही