उज्वल निकम राष्ट्रवादीतर्फे जळगावमधून लोकसभेच्या रिंगणात?

उज्वल निकम राष्ट्रवादीतर्फे जळगावमधून लोकसभेच्या रिंगणात?

मुंबई: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची जागावाटप तसेच उमेदवार ठरवण्यासाठी मुंबईत मॅरॅथॉन बैठक सुरू आहे. भाजप शिवसेनेला हरवण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने पूर्ण तयारीने उतरण्यासाठी जोरदार उनमेदवार देण्याचे ठरवले आहे.प्रख्यात वकील उज्वल निकम यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यावर राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवण्याचा दोन्ही कॉंग्रेसचा प्रयत्न आहे.

ज्या चाळीस जागांबाबत वाद नाही त्यांचे वाटप पक्के करण्यासाठी बैठक सुरू आहे. आठ जागांचा वाद असून त्याबाबत मॅरॅथॉन चर्चा सुरू आहे. परभणी,जळगाव, रावेर आदी जागांचा तिढा न सुटलेल्या मतदारसंघांत समावेश आहे.जळगावची चर्चा सुरू झाली तेव्हा उज्वल निकम यांना तेथून उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली.ही चर्चा राष्ट्रवादीच्या बैठकीत झाली. मात्र निकम यांच्याशी चर्चा करून त्यांची सहमती घेऊनच निर्णय घेतला जाणार आहे.

उज्वल निकम यांची वकिलीची कारकीर्द गाजलेली आहे.१९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट खटला, २६/११दहशतवादी हल्ला, कोपर्डी बलात्कार घटना अशा अनेक गाजलेल्या प्रकरणी निकम वकील होते. महाराष्ट्रात त्यांची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उज्वल प्रतिमा आहे. तिचाच उपयोग करून घेण्याचा राष्ट्रवादीचा इरादा आहे.

Previous articleआम्हाला कुणी अल्टिमेटम देऊ शकत नाही: संजय राऊत
Next articleविद्यार्थी फक्त मतदान केंद्रांवर चौकीदारी करण्यासाठी हवेत : अदित्य ठाकरे