गिरीश महाजन इव्हीएम मशिनचे हॅकर : अनिल गोटे

 गिरीश महाजन इव्हीएम मशिनचे हॅकर : अनिल गोटे

मुंबई : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आरोपांचा धडाका सुरूच ठेवला आहे. आज एक पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, गिरीश महाजन हे इव्हीएम मशिनचे हॅकर आहेत. महाजन यांच्या नेतृत्वाखाली धुळे महापालिकेत भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे.

निवडणुकीपूर्वी धुळ्यात मोबाईल टॉवर लावून महाजन यांनी हा प्रकार केल्याचे गोटे यांनी सांगितले.निवडणुकीत मी ८१ सभा घेतल्या असून त्यांना प्रचंड गर्दी होत होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभेला दोन टक्केही गर्दी जमत नव्हती.एका बाजूला माझी आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांची सभा तपासली तर याचे गांभिर्य लक्षात येईल, असे गोटे म्हणाले.महाजन यांच्या ईव्हीएम घोटाळ्यासाठी मुख्यमंत्री महाजनांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.भाजपने ईव्हीएम मशिनमध्ये हॅकिंग आणि वारेमाप पैशाचा वापर करून भाजपने विजय मिळवला, असा आरोपही गोटे यांनी केला.सर्वच राजकीय पक्षांना हा इशारा असल्याचे ते म्हणाले.

हैदराबादमधील हॅकरला धुळ्यातील पालिका निवडणुकीचे टेंडर देण्यात आले होते.ईव्हीएम मशिन ठेवलेल्या ठिकाणाजवळ मोबाईल टॉवर उभा करून त्या हॅक करण्यात आल्या. या टॉवरला महापालिकेची परवानगी नव्हती, असा आरोपही गोटे यांनी केला.हे सर्व महाजन यांनीय मॅनेज केले होते, असाही आरोप गोटे यांनी केला.

Previous articleसाडेतीन एकरचे मालक अशोक चव्हाण दोन हजार कोटीचे मालक कसे?
Next articleमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राहुल गांधींना भेटणार