फुले आंबेडकरांचा सरकारला विसर पडणे धक्कादायक

फुले आंबेडकरांचा सरकारला विसर पडणे धक्कादायक

सुप्रिया सुळे यांची टीका

पुणे: महाराष्ट्र राज्याच्या माहिती विभागातर्फे प्रसिद्ध केलेल्या कॅलेंडरमध्ये महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख नाही. याबद्दल राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

फुले आणि आंबेडकर यांचा उल्लेख कॅलेंडरमध्ये नसणे धक्कादायक आहे. एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस भाषणात फुले आणि आंबेडकर यांची नावे घेत असतात. दुसरीकडे कॅलेंडरमध्ये त्यांची नावेच विसरतात. हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे.

राज्याच्या प्रसिद्धी विभागाने जारी केलेल्या दिनदर्शिकेमध्ये फुले आणि आंबेडकर यांचा उल्लेख नसल्याप्रकरणी विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मुख्यनंत्री फडणवीस यांच्यावर सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी नेत्यांनी धारदार टीका केली आहे.राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे विरोधकांना सरकारला घेरण्याची या निमित्ताने संधीच मिळाली आहे. प्रत्येक सरकारविरोधी मुद्याचा निवडणुकीत वापर केला जाणार आहे.

Previous articleराज ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटले
Next articleधनगर समाजामुळेच आज आम्ही सत्तेत : पंकजा मुंडे