आरोग्यमंत्री दीपक सावंतांनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा

आरोग्यमंत्री दीपक सावंतांनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी अखेर आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.मंत्री दीपक सावंत यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत यापूर्वीच संपलेली आहे.

 शिवसेनेने मुंबई पदवीधर मतदार संघातून सावंत यांच्या ऐवजी विलास पोतनीस यांना संधी दिली आहे. त्यामुळे कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसलेल्या सावंतांना सहा महिन्याचा कालावधी मिळाला होता.त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०१८ रोजी संपली होती. कोणत्याही मंत्र्याला विधिमंडळाच्या सहा महिन्यांच्या कालावधीत दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून येण्याचे घटनात्मक बंधन आहे. सावंत यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी वर्णी लागावी म्हणून शिवसेनेत लॅांबींग सुरू असले तरी सध्या शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांतील संबंधाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleगेल्या पाच वर्षात मागाठाणे विधानसभा मतदार संघाची पिछेहाट : प्रविण दरेकर
Next articleमंत्रालयात तरूणाची स्टंटबाजी !