आता मित्रपक्षही चौकीदार चोर है म्हणत आहे:छगन भुजबळ
महाड : चौकीदार चोर है असे आता मित्रपक्ष शिवसेनाही म्हणत आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज भाजपला लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निर्धार परिवर्तन यात्रेला आज किल्ले रायगड येथून सुरूवात झाली. त्यावेळी भुजबळ यांनी भाजपवर टीका केली.
पंढरपूर येथे झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळत पंतप्रधान मोदी यांना चोर म्हटले होते.रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशिर्वाद घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यात्रेला सुरूवात झाली. राष्ट्रवादीचे तमाम दिग्गज नेते सामील झाले आहेत. रायगड, कल्याण, ठाणे या भागातून यात्रेचा पहिला टप्पा पार पडणार असून भाजपवर हल्लाबोल केला जाईल.अजित पवार यावेळी म्हणाले की, भाजप सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाल्याने परिवर्तन होणे गरजेचे आहे. जयंत पाटील, धनंजय मुंडे यात्रेत सहभागी झाले .