कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही: मेटे

कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही:विनायक मेटे

जालना: शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे हे भाजप शिवसना युती सरकारवर नाराज असल्याचे बोलले जाते. तरीही कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.


कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनुभव वाईट आले आहेत, असेही ते म्हणाले.
भाजप सरकारपुढे मी विविध मागण्या ठेवल्या आहेत.त्या अद्याप मंजूर झाल्या नाहीत.अशा वेळेस दुसऱ्या पक्षासोबत जाण्याचा प्रश्न येत नाही. भाजपने मागण्या मान्य केल्या नाहीत तर काय करायचे याचा निर्णय शिवसंग्राम पक्षाची कार्यकारिणी घेईल, असे त्यांनी सांगितले.येत्या २७ जानेवारीला शिवसंग्राम पक्षाचा वर्धापनदिन असून त्या दिवशी औरंगाबादच्या जबिंदा लॉन्स येथे महामेळावा होणार असल्याची माहिती मेटे यांनी दिली.


भाजप आणि शिवसेना यांच्यातील भांडण नवराबायकोेचे भांडण आहे. त्यात कुणी पडू नये, असे मेटे म्हणाले.भाजपकडे पक्षाने काही मागण्या ठेवल्या असून अजून त्या मान्य करण्यात आल्या नाहीत. त्या मंजूर झाल्या नाहीत तर काय करायचे याचा निर्णय कार्यकारिणी घेईल.भाजप सरकारचे निर्णय चांगले असून मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत, अशी प्रशंसा मेटे यांनी केली. मात्र निर्णयांची अमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही. त्यांनी आपल्या निर्णयांची अमलबजावणी त्वरेने चांगल्या पद्धतीने करावी, अशी आपली मागणी आहे, असे मेटे म्हणाले.भाजपसोबत असलो तरी येत्या निवडणुकीत योग्य निर्णय घेणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत किती आणि कोणत्या जागा मागणार, या प्रश्नाला त्यांनी तो नंतरचा प्रश्न आहे, असे सांगत अधिक काही बोलण्याचे मेटे यांनी टाळ

Previous articleआता मित्रपक्षही चौकीदार चोर है म्हणत आहे:छगन भुजबळ
Next articleभाजप-सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धार : अजित पवार