जेव्हा परिवर्तन यात्रेत अजितदादा आणि धनंजय मुंडे नाईट वॉक करतात तेव्हा..!

जेव्हा परिवर्तन यात्रेत अजितदादा आणि धनंजय मुंडे नाईट वॉक करतात तेव्हा..!

गुहागर : “लोकांची काम करत असताना स्वतः तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे असते. त्यामुळे संधी मिळाली तर दररोज चार ते पाच किलोमीटर पायी चालण्याचा प्रयत्न करत असतो” असे वक्तव्य आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसोबत नाईट वॉक करताना माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी करत व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले.

आज सकाळी रायगडावरील शिवरायांना मानवंदना देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा दणक्यात सुरू झाली. रायगडावर या टोकावरून त्या टोकावर पायपीट करून दिवसभरात दोन सभा झाल्या. त्यानंतर संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी जाताना तब्बल सहा किलोमीटरचा नाईट वॉक माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी केला.

दिवसभर काम करून अजितदादा ज्या तडफेने चालत होते ते बघून भल्याभल्यांना कडाक्याच्या थंडीत घाम फुटला असे म्हणावे लागेल. दादांपेक्षा वयाने लहानांना धाप लागत होती पण विविध विषयांवर चर्चा करत दादा झपाझप अंतर कापत होते आणि दादांच्या खांद्याला खांदा लावून धनंजय मुंडे चालताना अनेकजण येऊन दोघांशी संवाद साधत होते. देशात आणि राज्यात परिवर्तनाचा निर्धार करणारे दोघेही हसतमुखाने सर्वांशी संवाद साधताना बघून अनेकांनी आश्चर्यानी तोंडात बोट घातली नसती तर नवलचं!

Previous articleबाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा
Next articleगृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासंदर्भात लवकरच बैठक : मुख्यमंत्री