मध्यरात्रीच्या सुमारास उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !
मुंबई : बांद्रा-कुर्ला काँप्लेक्समधील एका आलिशान हॉटेलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली असल्याचा दावा राष्ट्र्वादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
येथिल बांद्रा-कुर्ला काँप्लेक्समधील एका हॉटेलमध्ये दोन दिवसापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.ये भेटीदरम्यान दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाल्याचेही सांगून,या दोघांमध्ये काय चर्चा झाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.या दोन पक्षामध्ये एकमेकांविरोधात चिखलफेक सुरू असताना उद्धव ठाकरेंना मुख्यंमंत्र्यांना लपूनछपून भेटण्याची अशी काय गरज पडली. आज बाळासाहेब ठाकरे असते तर अमित शहांची त्यांच्यासमोर बोलण्याची त्यांची हिंमत्तच झाली नसती असेही पाटील म्हणाले. ते राष्ट्रवादीच्या परिवर्तन मेळाव्यात बोलत होते.