धनंजय मुंडे जेव्हा बैलगाडी हाकतात

धनंजय मुंडे जेव्हा बैलगाडी हाकतात

खेड : अरे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे , बैलगाडी चालवणे हा लहानपणी माझा आवडता छंद होता, बैलगाडी कशी चालवायची हे मला नका सांगू असे म्हणत आज विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज परिवर्तन संकल्प यात्रे दरम्यानच्या बैलगाडी चालवून आपल्या नेत्यांचे सारथ्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीच्या सभेआधी खेड येथे सर्व नेत्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली.
विधान परिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडेंनी ही बैलगाडी चालवली.

मुंडेंनी सारथ्य केलेल्या बैलगाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, आ. संजय कदम आदी होते.या दरम्यान बैलगाडीत बाजूला बसलेला गाडीवानाला गर्दीत बैलगाडी नियंत्रित होत नसल्याचे लक्षात आले, तो मुंडे यांना, साहेब मी चालवू का म्हणाला त्यावर धनंजय मुंडे यांनी अहो मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, बैलगाडी कशी चालवायची हे मला चांगले येते असे म्हणत तिच्यावर नियंत्रित मिळवून सभास्थळा पर्यन्त घेऊन गेले.

उपस्थित पत्रकारांच्या नजरेतून ही गोष्ट चुकली असेल तर नवलच. मुंडे यांच्या या उत्तराला उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Previous articleमध्यरात्रीच्या सुमारास उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !
Next articleसमृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देणार ?