मुंबई नगरी टीम
मुंबई : सावकारी कर्जाला कंटाळून एका महिलेने आज दुपारी मंत्रालयाच्या गार्डन प्रवेद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच या महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
शारदा अरूण कांबळे ( वय ४५ वर्षे ) लाल डोंगर चेंबूर येथे राहणा-या या महिलेवर सावकारी कर्ज आहे. त्याचा वाद न्यायालयात सुरू असून,या महिलेने आज दुपारी मंत्रालयाच्या गार्डन प्रवेद्वाराजवळ सोबत बाटलीत आणलेले रॅाकेल अंगावर ओतून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच वेळेस मंत्रालयाच्या गार्डन प्रवेशद्वरावर सुरक्षेवर तैनात असलेल्या पोलीसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.या महिलेला मरीन ड्राईव्ह पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून,पुढील तपास मरीन ड्राईव्ह पोलिस करीत आहेत.