महागाईमुळे पिशवीतून पैसे आणि खिशातून सामान आणावे लागेल : छगन भुजबळ

मुंबई नगरी टीम

जळगाव : आज महागाई इतकी वाढतेय की पिशवीतून पैसे न्यावे लागतील आणि खिशातून सामान आणावे लागतील एवढे जनतेने लक्षात घ्या असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी चाळीसगाव येथील जाहीर सभेत केले.

मुलींना छळले जात असल्याने मुली आत्महत्या करत आहेत आणि शेतकरी ही सुखी नाही. तुम्हाला एवढं घडूनही दिसत नाही का असा संतप्त सवाल करतानाच परिवर्तन झालेच पाहिजे असेही आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सव्वाशे कोटी लोकांनी शिरोदत्त मानले आहे त्यामुळे सांगून ठेवतो राज्यातील कुठल्याही महिलेला किंवा कुटुंबांना त्रास दिला आणि त्यांना न्याय दिला नाही तर गप्प बसणार नाही असा इशाराही आमदार छगन भुजबळ यांनी दिला.एवढं सुंदर महाराष्ट्र सदन बांधले परंतु बनवणारा मात्र जेलमध्ये गेला. १०० कोटीचे कॉन्ट्रॅक्ट आणि मग मला साडेआठशे कोटी कसे मिळतील असा सवाल करतानाच या गोष्टीने छगन भुजबळ थांबणार नाही, घाबरणार नाही म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. अरे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर पंगा झाला तुम्ही तर काय आहात असेही भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.

यांना राममंदिर बनवायचे नाहीय ,यांना सरकार बनवायचं आहे. पुन्हा एकदा जातीजातीमध्ये भांडणं लावून तुम्ही मुर्ख आहात हे दाखवून दयायचे असे काम सरकार करत आहे असेही आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले. ही लढाई संविधान विरुद्ध मोदी अशी आहे.संविधानाने सव्वाशे कोटी लोकांना एका धाग्यात बांधून ठेवले आहे ते संविधान आपल्याला वाचवायचे आहे असे आवाहनही भुजबळ यांनी केले.

Previous articleमंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
Next articleगिरीष बापट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : धनंजय मुंडे