सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा डान्स बार महत्वाचा : राजू शेट्टी

मुंबई नगरी टीम

कोल्हापूर: डान्सबार परवानगीवरून सुरू झालेल्या राज्यातील राजकारणात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही उडी घेतली आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा डान्सबार महत्वाचे वाटतात,असा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

डान्सबार आणि ऊस उत्पादकांना एफआरपी रक्कम यावरून त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले.सरकारने डान्सबार प्रकरणी आपली बाजू कमकुवतपणे मांडली म्हणून डान्सबारला न्यायालयाने परवानगी दिली.यावरून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा डान्सबार महत्वाचे आहेत,हेच दिसते,असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी एकरकमी एफआरपीसाठी प्रसंगी तिजोरी रिकामी करू,असे म्हटले होते.त्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे आहेत,हे आम्ही भाजप अध्यक्ष अमित शहा यांना विचारू,असा टोलाही शेट्टी यांनी लगावला.शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीसाठी २८ जानेवारीला साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल करण्यात येणार आहे,असेही शेट्टी यांनी जाहीर केले. एकरकमी एफआरपी मिळाल्याशिवाय माघार नाही,असे ते म्हणाले.

Previous articleखासदार  संजय काकडेंना संन्यास घेण्याची वेळ येणार नाही : खोतकर
Next articleलोकसभा निवडणूकीपूर्वी हे दोन नेते कॉंग्रेसच्या गळाला?