गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी करा : धनंजय मुंडे 

मुंबई नगरी टीम

मुंबई : सय्यद शुजा या आंतरराष्ट्रीय सायबर तज्ञाने केलेला खुलासा अत्यंत धक्कादायक असून,स्व गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची राॅ मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मृत्यूबाबत सय्यद शुजा या आंतरराष्ट्रीय सायबर तज्ञाने केलेला खुलासा अत्यंत धक्कादायक आहे. स्व. मुंडे  यांचा मृत्यू झाला त्या दिवशीपासून आमचा आणि त्यांच्यावर प्रेम करणा-या प्रत्येक व्यक्तीचा हा अपघात का घात हा संशय होता आणि तो आजही कायम आहे.त्यांच्या मृत्यूबाबत आज जो खुलासा समोर आला तो ऐकूण या संशयाला पुष्ठी मिळते.हे प्रकरण एका मोठ्या नेत्याचा मृत्यू, सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील निवडणूकांशी संबंधित असल्याने याची रॉ च्या मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

२०१४ च्या निवडणुकीत इव्हीएम हॅक करण्यात आले होते याची माहिती गोपीनाथ मुंडे यांना होती म्हणूनच  त्यांची हत्या करण्यात आली असा दावा  तंत्रज्ञ सईद सहूजा यांनी केला आहे .इव्हीएम मशीनबाबत बहुतांश लोकांनी तक्रार केल्या आहेत. हे प्रकरण गंभीर आहे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

Previous articleमहिन्यानंतर माझे लग्न; नंतर तुमचे : खा.उदयनराजे भोसले
Next articleनिवडणुकीच्या तोंडावर  कोकणात भाजप घोषणांचा पाऊस पाडणार: खा चव्हाण