प्रियांकांच्या राजकारण प्रवेशाचा भाजपवर परिणाम होणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई: प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशावर भाजपने जळजळीत टीका केली.पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.त्या म्हणाल्या की,कोणत्याही महिलेने राजकारणात प्रवेश करणे हे नेहमीच सर्वच महिलांच्या हिताचे असते.प्रियांकाचा राजकारण प्रवेश हा कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे.प्रियांकांना शुभेच्छा पण त्यांच्या राजकारणात येण्याने भाजपवर काही परिणाम होणार नाही.

भाजपसाठी ही फार मोठी घटना नाही.उत्तरप्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या जागा जिंकणे भाजपसाठी, विशेष नाही,असेही त्या म्हणाल्या.भाजपने प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाच्या घोषणेनंतर जहाल टीका केली होती.प्रियांका यांना राजकारणात आणणे ही कॉंग्रेसची अगतिकता आहे,असे भाजपने म्हटले होते.पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने वेगळी भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.या अगोदरही अमृता फडणवीस यांनी पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. भाजपने मात्र प्रियांका यांच्यामुळे आमच्यावर काही परिणाम होणार नाही,असे सांगतानाच कॉंग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला आहे.

Previous articleशिवसेना मॅरेज ब्युरो नाही प्रपोजलची वाट बघायला
Next articleशिवसंग्राम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार: विनायक मेटे