मुंबई नगरी टीम
पुणे : गाजरांचा काल ढीगच ढीग पडला आहे. शेतकऱ्यांना महिना १५ हजार द्यायला हवे होते असे सांगताना, अहो चहा २० रुपयाला मिळतो आणि हे दिवसाला १७ रुपये शेतकऱ्यांना देणार आहेत, काय आहे हे असा संतप्त सवाल करीत, योगी और मोदी का एकच नारा न बसा घर हमारा न बसने देंगे तुम्हारा अशा शब्दात आमदार छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली.
यवत येथे झालेल्या सभेत भुजबळ यांनी हल्लाबोल केला.नोटाबंदीने आतंकवाद संपेल असे सांगण्यात आले. आतंकवाद संपला नाही उलट अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपने एक मारा तो हम दस मारेंगे बोलले परंतु आज काय आहे स्थिती आहे.बजेटमध्ये शेतकऱ्यांना महिना ५०० रुपये देण्याचे जाहीर करुन सरकारने लॉलीपॉप दाखवला आहे असा आरोपही भुजबळ यांनी केला.योगी और मोदी का एकच नारा न बसा घर हमारा न बसने देंगे तुम्हारा अशा शब्दात आमदार छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली.
पीक विम्यामध्ये सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. १७३ कोटी सरासरी जमा होतात. जवळजवळ ५५ हजार कोटी रुपयांचा फायदा विमा कंपन्यांना झाला आणि या सगळ्या कंपन्या अंबानी यांच्या आहेत असा आरोपही भुजबळ यांनी केला.ओबीसी महामंडळाला एक रुपया दिला अद्यापपर्यंत दिलेला नाही. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे अजून दिलेले नाही. हवेत होते परंतु पाच राज्याने पराभव दाखवला. उडने दो मिट्टी को परंतु ये कब तक उडेगी, हवाओं का रुख पलटा तो जमीनपर ही गिरेगी या शायरीतून सरकारच्या माजलेल्या कारभारावर जोरदार प्रहार केला.
निवडणुकीत जातीजाती मध्ये हिंदू मुस्लीम अशी दंगल घडवण्याचा प्रयत्न होईल त्यामुळे तुमचं डोकं शांत ठेवा. डोकं शांत ठेवलं नाही तर पुन्हा दंगलीच्या माध्यमातून सत्तेवर येतील त्यामुळे सावध व्हा असे आवाहनही आमदार छगन भुजबळ यांनी केले.ते बुलेटने हल्ला करतील परंतु आपण त्यांना बॅलेटने उत्तर देवू असे आवाहनही भुजबळ यांनी केले.यांना शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे,बेरोजगारांचे अश्रू पुसता येत नाही. हे तुमचं माझं नाही त्यामुळे रयतेचं राज्य आणुया असे आवाहनही भुजबळ यांनी शेवटी केले.