खिशात नाय दमडी अन गावजेवणाचू पिटतेय दवंडी : जितेंद्र आव्हाड

मुंबई नगरी टीम

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी यांना कालच्या बजेटच्या अनुषंगाने लगावला आहे. खिशात नाही दमडी अन गावजेवणाची पिटतोय दवंडी.निवडणूक जिंकण्यासाठी हे परत कर्ज काढणार आणि व्याजाच्या ओझ्याखाली सामान्य माणूस दबणार,असे आव्हाड यांनी म्हटले आहे. कालच्या बजेटच्या अनुषंगाने आव्हाड यांनी टीका केली आहे.

मोदी सरकारने काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला.शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजाराची मदत,असंघटित कामगारांना पेन्शन, मध्यमवर्गीयांना प्राप्तीकरात मोठी सवलत अशा लोकप्रिय घोषणा मोदी सरकारने बजेटमध्ये केल्या. या घोषणा निवडणूक जिंकण्यासाठी आहेत,हे सुचवतानाच आव्हाड यांनी सरकार त्या अमलात आणण्यासाठी कर्ज काढणार आणि त्याचे व्याज शेवटी सामान्य माणसालाच भरावे लागणार,अशी टीका केली आहे.आव्हाड यांनी आणखी एक ट्विट केले असून त्यात खिशात दोन रूपये बी नाय आता काय पैशाचा पाऊस पडणार हाय असे म्हटले आहे.सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या तरी त्यासाठी पैसा कुठून आणणार,असे आव्हाड यांनी सुचवले आहे.

Previous articleयोगी और मोदी का एकच नारा न बसा घर हमारा न बसने देंगे तुम्हारा : भुजबळ
Next articleराज्यात मागील वर्षी ३० हजार रस्ते अपघातात १३ हजार मृत्यू