मुंबई नगरी टीम
पुणे : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भाजप सरकारवरील टीका धारदार होत चालली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा आज पुण्यात होती.त्यावेळी भुजबळ यांनी वाह रे सरकार तेरा खेल,मॉंगा न्याय मिला जेल या शब्दांत भाजपवर निशाणा साधला.
भुजबळ म्हणाले की,भारतीय जनता पक्षाने सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासने दिली.पण त्यांनी ती पूर्ण केली नाहीत.एल्गार परिषदेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या आनंद तेलतुंबडे प्रकरणी भुजबळ म्हणाले की,सरकारच्या विरोधात कुणी काहीही बोलले की त्याच्याविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे.त्यामुळे परिवर्तन होणे गरजेचे आहे.
अजित पवार यांनी पुण्याच्या पाणीप्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना घेरले.राज्याच्या मंत्रिमंडळात पुण्याला वाली राहिलेला नाही,म्हणून पुण्याचा पाणीप्रश्न गंभीर झालेला आहे,अशा शब्दांत त्यांनी मंत्री गिरीष बापट यांना टोला लगावला.राज्य सरकारच्या मंत्र्यांची प्रशासनावर पकड नाही.अधिकारी सरकारचे ऐकत नाहीत. पुण्याचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे अजित पवार म्हणाले.