माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा भाजपात प्रवेश

मुंबई नगरी टीम

मुंबई : काँग्रेसमध्ये नाराज असलेले माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  त्यांनी भाजपात प्रवेश केला. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते आला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या भाजप प्रवेशाने रायगड मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

पेण विधान मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या रविशेठ पाटील यांना आघाडी सरकारच्या पहिल्या टप्प्यात राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली होती.काँग्रेसलाच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळलेल्या पाटील यांनी  गेल्या विधानसभा निवडणुकीत  अलिप्त राहणे पसंत केले होते. अंतुलेंचे  विश्वासू सहकारी अशीही त्यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोर जावे लागल्याने रविशेठ पाटील यांनी अंतुले यांच्या निधनानंतर सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले होते. काँग्रेसच्या बैठकांनाही ते उपस्थित राहत नसत झाले. जनसंघर्ष यात्रेच्या वेळी महाड येथे झालेल्या सभेकडेही ते फिरकले नाही.गेल्या काही दिवसांपासून ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा  होती.

Previous articleअनोखे “गोवा फेस्टीवल २०१९” खारमध्ये रंगणार
Next articleमिलिंद देवरांचा निवडणुकीतून माघार घेण्याचा इशारा