भाजप नेत्यांसाठी वेड्यांचे दवाखाने सुरू करा : धनंजय मुंडे

मुंबई नगरी टीम

नागपूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजप खासदार पूनम महाजन यांनी शकुनी,मंथरा अशी विशेषणे दिल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगलीच भडकली आहे. पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्यांसाठी वेड्यांचे दवाखाने सुरू करावे,असा टोला लगावला आहे.

शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर पूनम महाजन यांनी केलेली टीका निषेधार्ह आहे.महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती नाही.पवार साहेबांवर टीका करणारे राजकीयदृष्ट्या संपून गेले आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे,असे मुंडे यांनी म्हटले आहे.भाजप नेत्यांचा वाचाळपणा पाहता आता त्यांच्यासाठी वेड्यांचे मोफत दवाखाने सुरू करण्याची गरज असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला.पूनम महाजन यांनी सायन येथील भाजप कार्यक्रमात शरद पवार यांच्यावर कडक टीका करतानाच महागठबंधन हे महाठगबंधन असल्याची टीका केली होती.त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आदींनी पूनम महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादीने पूनम महाजन यांच्यावर टीका करताना प्रमोद महाजन यांच्या हत्येचे प्रकरण उकरून काढले.प्रवीणने प्रमोद को क्यूं मारा अशी पोस्टर्स लावली होती.भाजप आणि ऱाष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष आता तीव्र झाला आहे.

Previous articleविकासात आडवे येणाऱ्यांना बाटलीत बंद करून समुद्रात बुडवू : पंकजा मुंडे
Next articleयेत्या अधिवेशनापूर्वी कामगार सल्लागार मंडळ स्थापन करणार