आम्हाला जातीयवादी म्हणणारे आमच्या पंगतीत जेवून गेले : दानवे

मुंबई नगरी टीम

औरंगाबाद : आम्हाला जातीयवादी म्हणणारे सर्व जण आमच्या पंगतीत जेवून गेले आहेत. शरद पवार,चंद्राबाबू नायडू, ममता आमच्या बरोबर आधी होते. आता त्यांना आम्हाला जातीयवादी म्हणण्याचा अधिकार नाही, असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज चढवला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने उमेदवार देऊन त्यांचा पराभव केला. आता काँग्रेसला मागासवर्गीय मते मागण्याचा अधिकार आहे का, असा सवाल दानवे यांनी केला.

आरपीआय मेळाव्याचे उद्घाटन करताना दानवे बोलत होते. या वेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना भाजपने एकत्र यावे. २०१९चा सामना आम्हीच जिंकणार आहोत असा विश्वास व्यक्त केला.भाजपने मला शिवसेनेच्या दक्षिण मुंबई कोट्यातून निवडून आणावे,असेही ते म्हणाले.वंचित समाजाला न्याय हवा असेल तर त्यांनी माझ्यासोबत यावे, या शब्दात त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला.आरपीआयच्या मेळाव्याकडे शिवसेना नेत्यांनी मात्र पाठ फिरवली.

Previous articleभाजपने तिकीट न दिल्यास अन्य पर्याय शोधणार : संजय काकडे
Next articleरोहित पवार आणि सुजय विखे भेटीने नगरचा तिढा सुटला ?