मुंबई नगरी टीम
मुंबई : व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकत्रित फोटो टाकून खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील बेस्ट कपल असल्याचे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे.
यांच्या शिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच, केवढा तो एकमेकांवर जीव, नाही का? असे धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाईन डेचे औचित्यसाधून ट्वीट केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित असलेला फोटोही शेअर केला आहे.