शिवसेनेचा भाजपला ४८ तासांचा अल्टीमेटम ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण तापले असून भाजप आणि शिवसेना यांनाही आता युती करायची की नाही, यावरील अडलेले घोडे पुढे सरकवायची घाई झालेली दिसते आहे. म्हणूनच शिवसेनेने युतीबाबत दिलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यास ४८ तासांचा अल्टीमेटम दिला असल्याची चर्चा आहे.तर तिकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मित्रपक्षांना घेऊन महाआघाडी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.भाजप आणि शिवसेना यांच्यात नेत्यांच्या पातळीवर चर्चा सुरु असली तरीही संभ्रमावस्था कायम आहे. त्यात शिवसेनेतून वेगवेगळी वक्तव्ये येत असल्याने गोंधळात भर पडत आहे.युतीचे भवितव्य काय, अशी चर्चा रंगली आहे.

युतीचे चर्चेचे गुर्हाळ सुरु झाले असले तरी शिवसेना या वृत्ताला दुजोरा दिला नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकमेकांच्या संपर्कात आहेत तर दोन वरिष्ठ मंत्री प्रत्यक्ष चर्चा करत असल्याचे सांगण्यात येते.केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे भाजपच्या वतीने चर्चा करत आहेत.शिवसेनेने ज्या तीन शर्ती ठेवल्या आहेत, त्यात पालघरची जागा शिवसेनेकरता सोडावी,लोकसभेबरोबर विधानसभेचे जागावाटप व्हावे आणि शिवसेनेला हवा असलेला नाणार प्रकल्प रद्द करावा आणि पंतप्रधान मोदी किंवा अमित शहा यांच्यापैकी कुणी तरी शिवसेनेची मातोश्रीवर येऊन मनधरणी करावी, अशा तीन शर्ती शिवसेनेने ठेवल्या आहेत असे समजते. मात्र भाजप या शर्ती मान्य करणार का, हा मोठा प्रश्न आहे.

जागावाटपाचे सूत्र ठरले असल्याचे अनधिकृत वृत्त होते. यानुसार शिवसेना लोकसभेच्या २३ तर विधानसभेच्या १४३ जागा लढवणार आणि उरलेल्या जागा भाजप लढणार, असे ठरले असल्याचे सांगण्यात येते. मात्र यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. वेगवेगळ्या बातम्या येत असल्याने सारच संभ्रम कायम आहे. मात्र आघाडी प्रगती करत असताना युती मात्र अडली आहे.भाजप युतीसाठी जास्त आग्रही असल्याने शिवसेना आपल्या अपमानाचा बदल घेण्याचा प्रयत्न करत आहे,अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Previous articleमुख्यमंत्री आणि उध्दव ठाकरे राजकारणातील बेस्ट कपल ?
Next articleमहादेव जानकरांनी मागितल्या सहा जागा