चार जागा राखणे कठीण झाल्याने  शरद पवार रिंगणात

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.मात्र यावर भाजपने खोचक टीका केली असून पक्षाच्या गेल्या लोकसभेतील चार जागा राखणे कठीण झाल्यानेच शरद पवार स्वतः रिंगणात उतरले असल्याचे म्हटले आहे.

भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी ट्विट करून पवारांवर टीका केली आहे.शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विजयसिंह मोहिते यांनी माढ्यातून पवारांनी निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव मांडला.लोकसभेत खासदारांची संख्या वाढवून दबाव गट निर्माण करायचा असा पवारांचा हेतू असल्याचे पक्षाने सांगितले आहे. पण भांडारे यांनी हा आरोप करून राष्ट्रवादीला डिवचले आहे. आता राष्ट्रवादी भाजपच्या आरोपाला कसे उत्तर देते याची उत्सुकता आहे. पवार निवडणूक लढवणार यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले.

Previous articleमहादेव जानकरांनी मागितल्या सहा जागा
Next articleभुजबळ, नाईक यांचा निवडणुक लढवण्यास नकार