याला म्हणतात सत्तेसाठी नंगानाच : नितेश राणे
मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजप आणि शिवसेना यांची युती झाली असली तरीही मुख्यमंत्रीपदावरून वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद आम्हाला दिले नाही. तर युती तोडण्याचा इशारा दिल्यावर काँग्रेस नेते निलेश राणे यांनी आज ट्विट करून हल्ला चढवला आहे. याला म्हणतात सत्तेसाठी नंगानाच असा टोला त्यांनी भाजप आणि शिवसेनेला लगावला आहे.
युतीमध्ये पहिली ठिणगी कशामुळे पडली?शेतकरी प्रश्नावरून नाही,नाणार रद्द झाल्यावरून नाही आणि राम मंदिरावरूनही नाही तर मुख्यमंत्री आमचाच। याला सत्तेसाठी नंगानाच म्हणतात,असा टोला नितेश राणे यांनी मारला आहे.
भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीची घोषणा करताना मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी पदे आणि जबाबदारी यांचे समसमान वाटप केले जाईल,असे म्हटले होते. पण रामदास कदम यांनी लगेचच मुख्यमंत्रीपदाची मागणी करून वादाला तोंड फोडले. त्यामुळे नितेश राणे यांनी हे सारे सत्तेसाठी चालले आहे,अशी टीका केली आहे.मुख्यमंत्रीपद अडीच वर्षासाठी वाटून घेण्याचे ठरलेले नाही,असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्यावर कदम यांनी उद्धव ठाकरे, अमित शहा आणि फडणवीस यांच्यात सहमती झाल्याचे सांगत पाटील यांनी माहिती घेऊन बोलावे,असा सल्लाही दिला. या संपूर्ण वादावर नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे.