पुणे राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षपदी तृतीयपंथी
मुंबई नगरी टीम
पुणे : पुणे राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षपदी तृतीयपंथी चांदणी गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पुणे महापालिकेतील विरोधी नेते दिलीप बराटे आणि खासदार वंदना चव्हाण यांनी चांदणी गोरे यांना नियुक्तीपत्र दिले.पुणे राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षपदी प्रथमच एका तृतीयपंथीची निवड झाली आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे आयोजित नियोजन कार्यक्रमात चांदणी गोरे यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी रूपाली चाकणकर यांनी सांगितले की,राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुरोगामी महाराष्ट्राचा विचार पुढे नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.त्यामुळे आम्ही चांदणी गोरे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे.सुळे यांनी म्हटले आहे की,तृतीयपंथी आदर आणि सन्मानास पात्र आहेत,असे मला नेहमीच उत्कटतेने वाटते.त्यांचा सामाजिक समावेश आणि समान संधी देण्यासाठी माझा जोरदार पाठिंबा आहे.यापूर्वी आप या पक्षाने तृतीयपंथीची निवड पदाधिकारी म्हणून केली आहे.
तृतीयपंथीय आदर आणि सन्मानास पात्र असून त्यांना गृहीत धरले जाते, हे चुकीचे आहे,असे वक्तव्य राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. पुणे राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षपदी तृतीयपंथी चांदणी गोरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावर सुळे यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.पुणे राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षपदी तृतीयपंथी चांदणी गोरे यांची आज नियुक्ती करण्यात आली. खासदार वंदना चव्हाण आणि महपालिका विरोधी नेते दिलीप बराटे यांनी गोरे यांना नियुक्तीपत्र दिले.पुरोगामी महाराष्ट्र आणि महिला विचार पुढे नेण्यासाठी तृतीयपंथीची नेमणूक करण्यात आल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.