मोदींकडून सैन्याचे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न : भुजबळ

मोदींकडून सैन्याचे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न : भुजबळ

मुंबई नगरी टीम

नाशिक : जगातील पराक्रमी सैन्य आपल्या देशाला लाभले आहे. स्वातंत्र्य काळापासूनच सैनिकांनी आपले शौर्य दाखविले. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षण खात्याला अधिक बळकटी दिली. या अगोदर अनेक लढायला झाल्या मात्र यामध्ये कुठलाही पक्षीय राजकारणात कधीही वापर गेला गेला नाही. मात्र सद्या मोदी सैन्याचे राजकीयकरणं करण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका त्यांनी केली. ज्यावेळस देशावर पुलवामा सारखा हल्ला झाला अशा वेळेस सुद्धा मोदी मात्र भाजपचे गुणगान गाण्यात रम्य होते. अशा वेळेस काँग्रेसने मात्र आपले सर्व कार्यक्रम रद्द करून सैनिकांच्या मागे उभे राहिले. भाईओ और बहिनो देश मैरे हात मै सुरक्षित है असे पंतप्रधान सांगतात. देश सुरक्षित ठेवण्यासाठी सैन्य सीमेवर लढत आहे मोदी मात्र त्यात राजकारण करत आहे असे सांगून देशातील सैनिकांवर हल्ला झाला त्यावेळेस सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन सैनिकांच्या पाठीशी उभे राहिले आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.

देशात प्रगती करणाऱ्या शहरामध्ये नाशिक सोळाव्या स्थानी होते आणि आता मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले असतांना नुकताच आलेल्या अहवालातून नाशिक गायब झाले त्याची जागा नागपूरने घेतले मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले नाशिक गायब झाले कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खासदार समीर भुजबळ यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला त्यासाठी राज्यसरकारने आपला वाटा जाहीर केला आणि त्यानंतर केंद्रीय बजेट मध्ये मंजुरी मिळाली मात्र अद्याप झाले नाही. मात्र आता  पुन्हा एकदा सर्वेक्षणाचा घाट घालून जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले जात आहे. नाशिकमध्ये बोट क्लब कालाग्राम सारखे अनेक प्रकल्प पूर्ण केले तसेच अनेक प्रकल्पांचे काम सुरू करून दिले ते दत्तक पित्यानी पूर्ण करून प्रकल्प का सुरू केले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री नेमके काय दिले तुम्ही नाशिकला असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  पहारेकरी चौर हैं असे म्हणणारे उद्धव ठाकरे पुन्हा त्यांच्यासोबत जाऊन बसले आहे. सरकारने जनतेला फसवलं असं खुद्द उद्धव ठाकरे यांनी स्वतः कबूल केले आहे. सरकारचे निर्णय जनतेच्या विरोधात गेले असतील तर त्याला शिवसेना देखील तितकीच जबाबदार असे सांगून त्यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.

जेव्हा सेना बीजेपीच सरकार आलं तेव्हासुद्धा या छगन भुजबळने  विरोधी पक्षाचं समर्थपणे नेतृत्व केल  विविध मुद्द्यावर सरकारला धारेवर धरून सरकारला उत्तरदायी केल,गोपीनाथ मुंडेनी हे जाहीरपणे सांगितल होत कि भुजबळामुळे युतीची सत्ता गेली यामुळेच युती सरकार कायम छगन भुजबळानां लक्ष्य करते. ज्यावेळी उपमुख्यमंत्री या नात्याने माझ्याकडे गृहखातं होते आणि गृहखाते असताना मी मुंबईमध्ये जे  दाऊद टोळीचे गुंड होते ते खलास करण्याचं काम केलं त्यानंतर मला धमक्या यायच्या मात्र त्या वेळेपासून माझ्या घरातल सगळ्यात सॉफ्ट टार्गेट कोण असेल तर तो समीर होता,त्यावेळी इंटीलिजन्सच्या रिपोर्टप्रमाणे समीर हा सॉफ्ट टार्गेट आहे अस मला सांगण्यात आल होत.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या सभेपासून ते नोंदणी पर्यंत पक्षासाठी समीरने भरीव कार्य केलय , जेव्हा नारायण राणेनी आणि शिवसेनेने पुन्हा एकदा सरकार पाडण्याचा प्रयत्न १९९९ साली केला तेव्हासुद्धा आघाडीच्या आमदारांच्या संरक्षणाची जबाबदारी समीरने निभावली आणी आघाडीची सत्ता बचावली आणि हे विलासराव देशमुखांनासुद्धा माहिती होत , कृपाशंकराना माहिती आहे आणि आमच्या सगळ्यांना माहिती आहे, ज्या पद्धतीने समीरने त्यावेळी व्युव्हरचना केली आणि काही आमदारांना इंदोरला पाठविले, बँगलोरला पाठविले अगदी सुरवातीपासून तो माझ्यासोबत आणि आघाडी सोबत समर्थपणे काम करतो म्हणूनच समीर कायमच माझ्या विरोधकांच पाहिलं टार्गेट राहीला आहे.

म्हणूनच जेव्हा माझ्यावर कुठलेही आरोप होतात तेव्हा पहिले आरोप समीरवर करायचे अस षड्यंत्र विरोधकांनी कायम रचल आहे, माझ्यासोबत त्यांनी समीरला अटक करून मला संपवण्याचा कट केला आणि हे करून ते  इथेच थांबले नाही तर आज त्याचीच रेघ ते ओढत आहेत भुजबळाना कमजोर करायचं असेल तर समीरला कमजोर करा हे षड्यंत्र आहे. या षडयंत्रामध्ये आम्हाला गुंतवलं आणि म्हणून माझ्यामुळे समीरला या षडयंत्राला समोर जाव लागत आहे.  मी आज तुमच्यासमोर खंबीरपणे उभा आहे कारण तुरुंगातून मी जिवंत बाहेर येऊ शकलो ते समीरमुळे आणि नाशिककरांच्या प्रेमामुळे. तुरुंगात या सरकारने मला स्वतंत्र कोठडी दिली होती मी आजारी होतो तेव्हा समीर सगळी देखभाल करायचा तो सोबत होता म्हणून मला वेळेवर उपचार मिळाले अन्यथा या सरकारने कारस्थान केलेच होते भुजबळानां संपवायचे  असे त्यांनी सांगितले.

समीरला लक्ष्य करण म्हणजे भुजबळाना लक्ष्य करण पण मी किवा समीर असल्या कारस्थानांना पुरून उरू.जोपर्यंत कार्यकर्ते आणी नाशिकच्या जनतेच प्रेम सोबत आहे तो पर्यंत लढत राहू. आज देश कठीण प्रसंगात आहे शेतकरी आत्महत्या करतोय, शेतमालाला भाव नाही , बेरोजगारी वाढलीय ,सामाजिक तणाव वाढलाय ,संविधानाची पायमल्ली सरकार स्वतच करताय अश्या वेळी विरोधी पक्षाचे नेते म्हणून मी सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत का ? मुख्यमंत्री ठरवणार का कोणी काय बोलायचे ?हुकुमशाही आहे का? नाशिकचे आणि राज्याचे प्रश्न आम्ही मांडणारच मग भले तुम्ही हजार वेळा तुरुंगात टाकायच्या धमक्या द्या आम्ही मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

Previous articleनरेंद्र मोदींकडून जवानांच्या शौर्याचेही राजकारण : शरद पवार
Next articleबारामती की माढा महादेव जानकरांपुढे पेच