माजी आमदार नरसय्या आडम यांची हकालपट्टी 

माजी आमदार नरसय्या आडम यांची  हकालपट्टी 

मुंबई नगरी टीम

सोलापूर : माजी आमदार नरसय्या आडम यांच्यावर  माकपने  निलंबनाची कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या महिन्यात सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी नरसय्या आडम यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत व्यासपीठावरुन त्यांचे कौतुक केले होते.

माजी आमदार नरसय्या आडम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या व्यासपीठावर भाषण केले होते. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे कारण देत माकपने त्यांची तीन महिन्यांसाठी केंद्रीय कमिटीतून हकालपट्टी केली आहे. आडम गेल्या महिन्यात भाजपच्या व्यासपीठावर नुसते उपस्थित नव्हते तर त्यांनी पंतप्रधान मोदींची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरुन कौतुक केले होते. विडी कामगार व इतर कष्टकरी समाजासाठी त्यांनी हातात घेतलेल्या ३० हजार घरांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते.आघाडी सरकारच्या काळात दाबून ठेवलेली फाईल भाजप सरकारने मंजूर करुन निधी देखील दिला. त्यामुळेच मोदी सरकारचे कौतुक केले, असेही आडम मास्तर यांनी स्पष्ट केले होते.

Previous articleविमानतळ परिसरातील प्रत्येक झोपडपट्टीवासियाला मिळणार घर
Next articleपंच पक्षपाती म्हणुन १६ विकेट गेल्या नाहीत