भाजप खासदार किरीट सोमय्यांकडून सर्वाधिक निधी खर्च

भाजप खासदार किरीट सोमय्यांकडून सर्वाधिक निधी खर्च
मुंबई नगरी टीम
मुंबईःभाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी खासदार म्हणून मिळालेला निधी सर्वाधिक खर्च केला आहे. सोमय्यांनी शंभर टक्के निधी आपल्या मतदारसंघात खर्च केला आहे. भाजपच्याच खासदार प्रीतम मुंडे यांनी सर्वात कमी निधी खर्च केला आहे.
लोकसभा निवडणूक जवळ येत असताना प्रत्येक खासदारांनी किती निधी खर्च केला याचा लेखाजोखा घेतला जात आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्यांनी शंभर टक्के म्हणजे २५ कोटी रूपये निधी मतदारसंघात विकासकामांसाठी खर्च केला आहे.प्रीतम मुंडे यांनी फक्त सात कोटी ३२लाख रूपये खर्च केले आहेत.
राज्यात सर्वाधिक निधी खर्च करणार्यामध्ये भाजपच्या चार खासदारांचा समावेश आहे.तर एक शिवसेनेचा आहे.त्यापैकी दोन खासदार मुंबईचे आहेत.सर्वात कमी निधी खर्च करणा-यामध्ये  भाजपचे तीन तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एकेक आहे.सोमय्यांनंतर सर्वाधिक निधी वापरणाऱ्या खासदारांमध्ये रामदास तडस, श्रीकांत शिंदे,हीना गावित आणि पूनम महाजन यांचा समावेश आहे.
तर सर्वात कमी निधी खर्च करणार्या खासदारांमध्ये प्रीतम मुंडे,शिवसेनेच्या भावना गवळी,भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,रक्षा खडसे आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचा क्रमांक लागतो.सुप्रिया सुळे यांना संसदेत अभ्यासपूर्ण प्रश्न विचारल्याबद्दल उत्कृष्ट खासदार म्हणून गौरविण्यात आले आहे. पण सुप्रिया सुळे यांची निधी खर्च करण्याबाबत मात्र कामगिरी अगदीच सुमार आहे.
Previous articleराज ठाकरे उद्या काय बोलणार याची उत्सुकता शिगेला
Next articleशहिदांच्या कुटुंबियांना शेतीयोग्य जमिनीचे वाटप