उगाच शिव्या घालणा-यांना घराबाहेर काढून मारा

उगाच शिव्या घालणा-यांना घराबाहेर काढून मारा

मुंबई नगरी टीम

मुंबई : समाज माध्यमांमध्ये आपल्या विरोधात उगाच शिव्या घालणा-यांना घराबाहेर काढून मारा असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसैनिकांना दिले. मी समाज माध्यमांवर प्रसिद्ध करीत असलेल्या व्यंगचित्राला मुद्द्यांनी उत्तर मिळणार असेल तर ठिक मात्र आपल्या कोणत्याही भूमिकेवर शिव्या घातल्या गेल्या तर अशांना घराबाहेर काढून मारा असा आदेश देतानाच भाजपची नाटक खूप झाली,आता सरकारने याबाबत खबरदारी घ्यावी असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिल्याने आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपा विरूद्ध मनसे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे आज मनसे वर्धापन मेळाव्यात काय बोलणार,याची प्रचंड उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. निवडणुकीसाठी पुलवामा हल्ला घडवण्यात आला,असे अप्रत्यक्षरित्या सुचवतानाच निवडणुकीआधी आणखी एक पुलवामासारखा हल्ला घडवून आणला जाईल, असे भाकीत त्यांनी वर्तवले. मोदी हे फकीर नाहीत तर बेफिकीर आहेत,असा टोला त्यांनी लगावला.तसेच भाजपच्या भंपक ट्रोलर्सना घराबाहेर काढून चोपा,असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मात्र राज ठाकरे आज लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी काहीतरी घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र राज ठाकरे यांनी त्याबाबतीत नंतर निर्णय जाहीर केला जाईल,असे सांगितले.मात्र त्यांनी आपल्या भाषणात मोदी आणि भाजप यांनाच लक्ष्य केले.

पुलवामा हल्ल्यानंतर मोदी यांचे फोटो अगदी टापटीप पोषाखात आहेत, याचा उल्लेख करून त्यांनी मोदी यांना जवान ठार मारल्याचे कसलेही दु:ख यांना झालेले राहणीमानावरून दिसले नाही, असे ते म्हणाले. चाळीस माणसे मारली गेली आणि पंतप्रधान मात्र शांतता पुरस्कार घेण्यात मग्न होते,असा आरोप त्यांनी केला.पुलवामा हल्ला घडवण्यात आला,असे सुचवताना राज ठाकरे म्हणाले की,गुप्तचर खात्याने हल्ल्याची कल्पना दिली होती. जवानांना एअरलिफ्ट करा,असे सांगितले होते.तरीही त्यांना धोका असलेल्या रस्त्यावरून का नेण्यात आले,असा सवाल त्यांनी केला.मी असे काहीतरी घडेल,असे मागच्या वेळी बोललो होतो,याची आठवण त्यांनी करून दिली.
हवाई हल्ल्यात किती माणसे मारली गेली,यावर भाजप नेत्यांनी लगेच वल्गना करण्यास सुरूवात केली.अमित शहा यांनी आकडा सांगितला.ते काय विमानात को पायलट म्हणून बसले होते का,असा टोला त्यांनी लगावला.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली.डोवाल यांची मुले काय करतात,हे कॅरेव्हान नावाच्या पोर्टलवर सांगितले आहे. त्यांची चौकशी करा,ब-याचच गोष्टी बाहेर येतील,असे मी म्हणालो.त्यावर मला ट्रोल करण्यात आले.मी भंपक ट्रोलर्सना भीक घालत नाही. पण भाजपच्या भंपक ट्रोलर्सना घराबाहेर काढून चोपा,असा आदेश त्यांनी मनसैनिकांना दिला.

Previous articleआता सुप्रीम कोर्टाला ही गलथान निर्णय म्हणणार का ?
Next articleवाचा……कोणत्या मतदारसंघात केव्हा होणार मतदान