वाचा……कोणत्या मतदारसंघात केव्हा होणार मतदान

वाचा……कोणत्या मतदारसंघात केव्हा होणार मतदान

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्रिय निवडणुक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, देशभरात एकूण ७ टप्प्यात निवडणुका होणार आहे. तर महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिल रोजी ७ जागांसाठी मतदान होईल. दुस-या टप्प्याचे मतदान १८ एप्रिल रोजी १० जागांसाठी  होणार आहे. तिस-या टप्प्यासाठी २३ एप्रिल रोजी, १४ जागांसाठी मतदान होणार आहे तर शेवटच्या टप्प्यात  २९ एप्रिल  रोजी १७ जागांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. लोकसभेची आचारसंहिता आज पासून लागू झाली आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून, यंदा राज्यात ८ कोटी ७३ लाख मतदार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी ७ दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

असा असेल महाराष्ट्रात निवडणूक कार्यक्रम

पहिला टप्पा (११ एप्रिल ) –  मतदार संघ पुढील प्रमाणे १ ) वर्धा, २ ) रामटेक, ३ )  नागपूर ,४ ) भंडारा गोंदिया,५ ) गडचिरोली चिमुर,६ ) चंद्रपूर, ७ ) यवतमाळ वाशिम.

दुसरा टप्पा ( १८ एप्रिल ) – १ ) बुलढाणा, २ ) अकोला, ३ ) अमरावती, ४ ) हिंगोली, ५ ) नांदेड, ६ ) परभणी, ७ ) बीड, ८ ) उस्मानाबाद , ९ ) लातुर, १० ) सोलापूर.

तिसरा टप्पा  ( २३ एप्रिल ) -१ ) जळगाव, २ ) रावेर, ३ ) जालना, ४ ) औरंगाबाद , ५ ) रायगड, ६ ) पुणे , ७ ) बारामती, ८ )अहमदनगर , ९ ) माढा, १० ) सांगली, ११ ) सातारा , १२ ) रत्नागिरी सिंधूदुर्ग, १३ ) कोल्हापूर, १४ ) हातकणंगले.

चौथा टप्पा  ( २९ एप्रिल ) -१ ) नंदुरबार, २ ) धुळे, ३ ) दिंडोरी, ४ ) नाशिक, ५ )पालघर, ६ ) भिवंडी, ७ ) कल्याण , ८ ) ठाणे, ९ ) उत्तर मुंबई , १० ) उत्तर पश्चिम मुंबई, ११ ) उत्तर पूर्व मुंबई ,१२ ) उत्तर मध्य मुंबई ,१३ ) दक्षिण मध्य मुंबई , १४ ) दक्षिण मुंबई, १५ ) मावळ, १६ ) शिरूर, १७ ) शिर्डी.

लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून सर्व यंत्रणा सज्ज आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी ४८ मतदारसंघासाठी एकूण ४ टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या ७ जागांसाठी ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे.  बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर  या १० जागांसाठी १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या १४ जागांसाठी २३ एप्रिल २०१९ रोजी  मतदान होणार आहे. नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण-मुंबई, मावळ, शिरुर आणि शिर्डी या १७ ठिकाणी २९ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे.  मतमोजणी २३ मे २०१९ रोजी होणार आहे.  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ४८ मतदारसंघात ३ टप्प्यात मतदान झाले होते.

 मतदारांची संख्या :-

              सन २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीच्या तुलनेत दिनांक दि.३१ जानेवारी २०१९ रोजी प्रकाशित अंतिम मतदार यादीनुसार महाराष्ट्रातील मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र. तपशील सन २०१४ सन २०१९
पुरुष ४,२७,७०,९९१ ४,५७,०२,५७९
महिला ३,८०,२६,९१४ ४,१६,२५,८१९
तृतीयपंथी ९१८ २,०८६
  एकूण ८,०७,९८,८२३ ८,७३,३०,४८४

 

 

 

 

 

Previous articleउगाच शिव्या घालणा-यांना घराबाहेर काढून मारा
Next articleशरद पवार यांची माढ्यातुन माघार; मावळमधून पार्थ पवार