मोहिते पितापुत्र भाजपच्या वाटेवर?
मुंबई नगरी टीम
मुंबईःराष्ट्रवादी काँग्रेसला माढ्यात जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील आपले पुत्र रणजीत सिंह यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर राष्ट्रवादीसाठी जबर धक्का असेल.
रणजिजीतसिंह मोहिते पाटील यांनी काल रात्री उशिरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांचीही ही पहिली भेट नव्हती. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या दिवशीही मोहिते पाटील गिरीश महाजनांना भेटले होते.
येत्या एक-दोन दिवसात रणजीत सिंह मोहिते पाटील मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही यादीत मोहिते-पाटलांचे नाव नाही.त्यामुळे मोहिते पाटील अस्वस्थ आहेत.प्रभाकर देशमुख यांची थोरल्या पवारांशी वाढती.जवळीक त्यांना बेचैन करत आहे. मोहिते-पाटील आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय घेणार आहेत.त्यांनीही भाजपमध्ये जाण्याची तयारी केली आहे.